आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड विद्यापीठात मराठी भाषा प्रयोगशाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मराठीच्या विविध बोलींमधील वैविध्यपूर्णता लक्षात घेऊन या बोलींचे नमुने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जतन करणारी देशातील पहिली भाषा प्रयोगशाळा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाड््मय व संस्कृती अभ्यास संकुलात आकाराला येणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी विद्यापीठ आणि न्यूयॉर्क येथील अनुभव ट्रस्ट या संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी दिली. दरम्यान, विद्यापीठात इंग्रजीतील संभाषण कौशल्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे.
भारतीय भाषांपुढे अनेक आव्हाने आहेत. या भाषांचे जतन करणे व त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. मराठीच्या संवर्धनांचा संग्रह करण्याचा मानस न्यूयॉर्कमधील अनुभव ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मोहन कुलकर्णी यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्याकडे व्यक्त केला. त्यातून या अभिनव प्रयोगशाळेची संकल्पना आकाराला आली. मराठी आणि इंग्रजीसाठी स्वतंत्रपणे उभारण्यात येणारी ही प्रयोगशाळा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी सुसज्ज असणार आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून इंग्रजी व मराठी भाषांच्या प्रभावी अध्यापनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रयोगशाळेवर आधारलेला इंग्रजीतील संभाषण कौशल्याचा सर्वांसाठी खुला असलेला एक प्रमाणपत्र अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहे. भाषा अध्यापनाव्यतिरिक्त ही प्रयोगशाळा एक प्रकारचे मराठीच्या विविध बोलींचे संवर्धन करणारे संसाधन केंद्र असणार आहे. मराठीच्या विविध बोलींतील नमुने संग्रहित करून त्याद्वारे व्हाइस बँक तयार केली जाणार आहे. निरनिराळ्या कालखंडातील व प्रदेशांतील भाषिक उच्चारांचे असंख्य नमुने संग्रहित करून त्यांचे
संग्रहालय या प्रयोगशाळेत उभारले जाईल. अभ्यासक, विद्यार्थी, संशोधक यांना या संग्रहालयाचा लाभ होईल, असे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...