आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत तारेचा शॉक लागल्‍याने एकाच कुटुंबातील तीन ठार, बीड जिल्‍ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - घरासमोर असलेल्‍या विद्युत वाहिनीचा शॉक लागून एका शेतकरी कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना बाळापूर (ता. बीड) येथे गुरुवारी रात्री 12 ते 1 वाजताच्‍या सुमारास घडली. बाबासाहेब सुरवसे, सुभाष सुरवसे आणि अशोक सुरवसे अशी मृतांची नावे आहेत. ह
नेमके काय झाले ?
> गुरुवारी रात्री बाळापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
> त्‍यामुळे सुरवसे कुटुंबीयांच्‍या घरासमोरून गेलेली विद्युत वाहिनी तुटून पडली.
> यावेळी सुरवसे कुटुंबातील एक सदस्‍य रात्री घराबाहेर गेला.
> त्‍याचा या तारेला स्‍पर्श झाला.
> त्‍याला वाचवण्‍यासाठी त्‍याचे वडील आणि भाऊ तत्‍काळ बाहेर आले.
> मात्र, त्‍यांनाही विजेचा धक्‍का बसला. यात तिघांचाही घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला.
> या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
बाळापूर गावावर शोककळा
या घटनेमुळे संपूर्ण बाळापूर गावावर शोककळा पसरली असून, हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, उपोषणाला बसलेल्‍या शिक्षकाचा हृदयविकारच्‍या झटक्‍याने मृत्‍यू, औरंगाबादमधील घटना
बातम्या आणखी आहेत...