आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 18 महिन्यांचे काम 9 दिवसांत, 50 वॅगनची लांबलचक जलराणी लातुरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिरज - दुष्काळग्रस्त लातूरला दिलेल्या मुदतीत पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार व रेल्वे प्रशासन गेल्या काही दिवसांपासून कमालीचे प्रयत्न करीत होते. सरकारी कामांचा अनुभव घेता रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी किमान १८ महिन्यांचा अवधी लागला असता. मात्र रेल्वेमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी लक्ष घातल्याने १८ महिन्यांचे काम अवघ्या ९ दिवसांत पूर्ण करण्याची किमया साधली आहे.
साधनांची जुळवाजुळव करताना रेल्वे रुळाच्या खालून पाइपलाइन नेणे खूप अवघड होते. याला किमान सहा महिन्यांचा अवधी लागला असता. मात्र खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याप्रश्नी गंभीर असल्याने काही तासांतच रेल्वे क्रॉस म्हणजेच रुळाच्या खालून पाण्याचे पाइप नेण्यास मंजुरी मिळाली. २७०० मीटरच्या पाईपलाईनमध्ये सहा रेल्वे क्रॉस व दोन रस्ते क्रॉस आहेत. या सगळयाबाबींची पूतर्ता झाल्यानंतर ५० वॅगननी भरलेली जलदूत मंगळवारी अखेर मिरज रेल्वे स्थानकाच्या यार्ड मधून लातूरला रवाना झाली. मंगळवारी एकाच दिवशी सुमारे ३० लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले. पुढील दोन महिने लातूरला नव्या स्वतंत्र यंत्रणेद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे.

यांचे काम मोलाचे
रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची योजना रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवली. ती रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी मान्य केली. त्यानुसार योजनेचे काम सुरू झाल्यापासून स्वत: देशपांडे, तहसिलदार शेखर परब, मक्तेदार शशांक जाधव व वाघीश जाधव, सहाय्यक परिचालन व्यवस्थापक जय जॉर्ज, मुख्य यार्ड पर्यवेक्षक विनोद कुलकर्णी, महाराष्ट जिवन प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता सुशांत कुलकर्णी, एस जी सदीगळे यांच्यासह रेल्वेच्या कर्मचारयांनी परिश्रम घेतले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, उभारणी खर्च... प्राचीन हैदर खान विहीर लातूरकरांसाठी संजीवनी...
सात दिवसांमध्ये टाकली २७०० मीटर पाइपलाइन....पाणी उपशासाठी अशी उभारण्यात आली यंत्रणा... लातूरकर म्हणतात, गरजूंनाच पाणी मिळेना... खडसेंनी उद््घाटन केले, अद्याप पाणी नाही आले... सध्या दिवसाला ३० लाख लिटर पाणी उपलब्ध ...