आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा : जायकवाडीतून सोडलेले पाणी माजलगाव धरणामध्ये दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - कमी पावसामुळे माजलगाव धरणातील पाण्याची पातळी मृतसाठ्यात असून भविष्यातील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून २ सप्टेंबर रोजी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. रविवारी हे पाणी माजलगाव प्रकल्पात दाखल झाले असून जवळपास तीन महिने पाण्याची आवक सुरू राहणार आहे.

जायकवाडी प्रकल्पात ८२० दलघमी पाणी माजलगाव धरणात सोडण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून १३१ दलघमी पाणी दोन टप्प्यांत माजलगाव धरणात सोडण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा ५.१७८ दलघमी पाणी म्हणजे प्रत्यक्ष ४०० क्युसेकने सोडण्यास २ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. जायकवाडी ते माजलगाव धरणाचे अंतर १३२ किलोमीटर असून हे पाणी रविवारी सायंकाळी सहा वाजता माजलगाव धरणात दाखल झाले असून पाण्याची आवक तीन महिने राहणार आहे.

माजलगाव धरणात पाणी हे मृतसाठ्याच्याही खाली आहे. मृतसाठ्याच्या वर पाणी येण्यासाठी दोन मीटर अंतर कमी आहे. जरी जायकवाडी धरणातून ४.५ टीएमसी पाणी सोडले असले तरी कालव्याद्वारे प्रत्यक्षात पाणी किती येते त्यावर माजलगाव धरणाची पाणीपातळी अवलंबून आहे.

त्यानुसार माजलगाव प्रकल्पात आलेले पाणी हे शेतीसाठी, पिण्यासाठी की परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. माजलगाव धरणातील आलेल्या या जायकवाडीच्या पाण्यातून माजलगाव शहरासह ११ खेडी, तालुक्यातील गावे व बीड शहराला बॅक वॉटर योजनेतून पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर परळी थर्मलसाठी या प्रकल्पातून पाणी देण्यात येते. माजलगाव धरणात जायकवाडी धरणातून किती पाणी येते यावर पिण्यासाठी, थर्मलसाठी व यानंतर शेतीसाठी विचार होईल.
बातम्या आणखी आहेत...