आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्‍ल‍िमांना आरक्षण द्या, अॅट्रॉसिटी अधिक कडक करा, लातूरमध्‍ये निघाला महामोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - अॅट्रासिटी कायद्यात सुधारणा कराव्‍या, यासह इतर मागण्‍यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने राज्‍यभरात विराट मोर्चे काढले जात आहेत. दरम्‍यान, अॅट्रासिटी कायद्यात बदल न करता त्‍याची काटेकोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी लातूरमध्‍ये आज (गुरुवार) दलित समाजाच्‍या वतीने विराट मोर्चा काढण्‍यात आला. या मोर्चाला एमआयएमनेही पाठिंबा दिला.
असा निघाला मोर्चा
- आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली.
- त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.
- मराठा मोर्चाप्रमाणेच अत्यंत शांतपणे हा मोर्चा काढण्यात आला.
या आहेत मागण्‍या
- अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.
- त्याचे खटले तातडीने निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावे.
- कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी.
- मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे.
- गोरक्षणाच्या नावाखाली दलित आणि मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय तातडीने थांबवावेत.
मराठा समाजाचा विरोध नाही
हा मोर्चा मराठा समाजाच्‍या विरोधात नाही, आमच्या न्याय हक्क मागण्यांसाठी हा मोर्चा आहे, असे मोर्चाच्‍या संयोजकांनी स्‍पष्‍ट केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मोर्चाचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...