आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकार सत्तेसाठी उतावीळ, सोनिया अरुणाचल प्रश्नावर नांदेडमध्ये गरजल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिया गांधींचे स्‍वागत करताना सुशीलकुमार शिंदे, बाजूला चव्‍हाण. - Divya Marathi
सोनिया गांधींचे स्‍वागत करताना सुशीलकुमार शिंदे, बाजूला चव्‍हाण.
नांदेड -काँग्रेस सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात दलित-आदिवासी, कामगार, शोषित व महिलांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी याेजना केंद्रातील मोदी सरकार कमकुवत करत आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी येथे बोलताना केली. केंद्र सरकारचे हे षड‌्यंत्र काँग्रेस कदापिही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी मोदी सरकारला दिला.

उपेक्षितांसाठीच्या या योजना कमकुवत केल्याने देशातील कोट्यवधी कुटुंबांचे हाल होत आहेत. हाच वर्ग काँग्रेसचा जनाधार राहिला असल्याचे सोनिया म्हणाल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मृती संग्रहालयाचे उद‌्घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी जाहीर सभेत सोनिया बोलत होत्या. माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. आपल्या १२ मिनिटांच्या भाषणात सोनिया यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शंकरराव चव्हाण हयात असते तर हे सर्व पाहून त्यांना अतीव दु:ख झाले असते, असेही सोनिया यांनी नमूद केले.
शेतकरी संकटात आहे याची सरकारला आठवण करून द्यावी लागते. उद्योगपतींचे कोट्यवधींचे रुपयांचे कर्ज माफ केले जाते, मात्र शेतकऱ्यांना काही मिळत नाही, असेही सोनिया म्हणाल्या.
मातीशी नाळ : राज्याला सुजलाम सुफलाम केले...
इंदिराजींचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शंकरराव मातीशी नाळ असलेले नेते होते. मराठवाड्यासारख्या कमी पर्जन्यमानाच्या दुष्काळी भागातून त्यांचे नेतृत्व उदयाला आले. त्यामुळे सिंचनासारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून त्यांनी मराठवाड्यासह राज्याला सुजलाम‌् सुफलाम‌् करण्याचा प्रयत्न केला. केवळ शेतकरीच नाही तर देशातील गरीब, आदिवासी, दलित, सर्व घटकांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे सोनिया म्हणाल्या.
शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
माजी केंद्रीय मंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी आयटीएम परिसरात उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मृती संग्रहालयाचे उद््घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. या वेळी सोनियांनी शंकररावांच्या प्रशासकीय गुणांचा तसेच त्यांच्या काँग्रेस निष्ठेचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. इंदिरा गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे शंकरराव यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात शांतता प्रस्थापित करण्यात मोठी कामगिरी केली. राजीव गांधी सरकारमध्ये शंकररावांनी पंजाब व ईशान्य भागात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले.
शंकरराव हेडमास्तर...
प्रशासकीय कौशल्य आणि त्यांची दुरदृष्टी यामुळे शंकररावांचा लौकिक होता. म्हणूनच त्यांची प्रशासनावर पकड होती. प्रशासनातील ‘हेडमास्तर’ अशी त्यांची ओळख होती, अशा शब्दांत सोनियांनी गौरव केला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...