आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोदींची माफी मागा, अन्‍यथा तंगड्या तोडू\', श्रीपाल सबनीस यांना धमकीचा फोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील उमरगा येथे दोघांनी फोन करून जीवे मारण्‍याची धमकी दिली आहे. सबनीस यांनी उमरगा पोलिसांकडे तशी तक्रार केली आहे. कॉ. विठ्ठल सगर यांच्‍या प्रथम स्‍मृतीदिनानिमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानासाठी सबनीस उमरगा येथे होते. व्‍याख्‍यान संपल्‍यानंतर त्‍यांना धमकीचा फोन आला. 'मोदींची माफी मागा, नाहीतर तंगड्या तोडू.' अशी धमकी देण्‍यात आल्‍याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात श्रीपाल सबनीस यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचा राज्‍यात विविध ठिकाणी निषेध करण्‍यात येत आहे. उमरग्‍यामध्‍येही सबनिस यांना भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी काळे झेंडे दाखवत त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध केला. त्यांनी माफी मागावी अन्यथा पिंपरी-चिंचवडमधील आगामी संमेलन उधळून लावू असा इशारा भाजपचे खासदार अमर साबळे यांनी दिला आहे. आरपीआयचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनीही सबनीस यांच्या वक्तव्याचा निषेध करीत साहित्यिक मंडळी पंतप्रधानांवर नाहक चिखलफेक करणार असतील तर पिंपरीतील साहित्य संमेलन उधळून लावू, असा इशारा त्यांनीही दिला.
उमरग्‍यात काय घडले...
- दुपारी एक वाजता सबनीस यांच्‍या व्याख्‍यानाचे उमरगामध्‍ये आयोजन होते.
- दरम्‍यान भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍यांना काळे झेंडे दाखवत निषेध केला.
- व्‍याख्‍यान संपल्‍यानंतर सबनीस यांना धमकीचा फोन आला.
- उमरगा पोलिस ठाणे गाठून दूपारी 1. 11 ला सबनीस यांनी तक्रार दिली.

पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून वाचा, धमकीनंतर काय म्‍हणाले सबनीस...