आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवारमध्ये नदी पुनरुज्जीवन, लातूर जिल्ह्यात 8 नद्यांसाठी 6.41 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड जिल्ह्यातील वडवणी येथे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पुसरा येथील छावणीला भेट दिली. - Divya Marathi
बीड जिल्ह्यातील वडवणी येथे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पुसरा येथील छावणीला भेट दिली.
लातूर - जलयुक्त शिवार योजनेला मिळालेले यश पाहता यावर्षीपासून त्यात नव्याने नदी पुनरुज्जीवनाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी निलंग्यातील आढावा बैठकीत केली. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदार संभाजी निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांसमोर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांचे सादरीकरण केले. मागेल त्याला शेततळे, अन्न सुरक्षा योजना अशा योजना सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीवर करडी नजर ठेवण्याची सूचना केली. शेततळे योजनेत उद्दिष्ट दिले असले तरी त्याला किमानची पातळी नाही, कमाल कितीही केले तरी कौतुकच आहे. खासदार, आमदारांनीही त्यात पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. यावर्षी जलयुक्त शिवारमध्ये नदी पुनरुज्जीवनाचा समावेश केला आहे.
या नद्यांचे पुनरुज्जीवन
देव, घरणी, तावरजा, तेरणा, मुरडा, जाना, तिरू, दारणा, या नद्यांचे पुनरुज्जीवन होणार. त्यासाठी ६.४१ कोटींची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.