आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात पाच जिल्हे, २८ पालिका, ३३३७ उमेदवार रिंगणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड जिल्ह्यात ३ लाख १७ हजार ११८ मतदार
बीड - बीडसह गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई ,परळी व माजलगाव या सहा नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून २८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. सहा नगराध्यक्षपदांसाठी एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यामध्ये २३ महिला तर ३५ पुरुष आहेत. नगरसेवकपदाच्या १७२ जागांसाठी सहा पालिकांमधून ८७५ रिंगणात आहेत. बीडमध्ये क्षीरसागर बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्या गटात लढत होत आहे. माजलगाव, गेवराई व धारूरमध्ये तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यातील सहा नगरपालिका निवडणुकीसाठी ४१३ मतदान केंद्रे असून त्यापैकी सात केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. तर ११९ केंद्रांचा संवेदनशील म्हणून समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात २८७ केंद्रे सर्वसाधारण आहेत. रविवारी सहा नगरपालिकांच्या हद्दीत व्हिडिओग्राफी, सर्व्हेनियन्स पथक, भरारी पथके, तक्रार निवारण पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय चेकपोस्टद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त करणार आहेत. दरम्यान ,बीडसह गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर या सहा नगरपालिकांत प्रभागांची संख्या ८४ असून १७२ नगरसेवक निवडले जाईल.

मतमोजणीसाठी ४०० कर्मचारी नियुक्त
जिल्ह्यात मतमोजणीसाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. बीडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती गोदाम क्रमांक ४ व ५ मध्ये होणार असून ११० कर्मचारी काम करणार आहेत. तर अंबाजोगाईत शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात होणार असून त्यासाठी ८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ६ नगरपालिकांच्या मतमोजणीसाठी ४०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले .
पुढे वाचा इतर जिल्ह्यांची मतदानाची तयारी...
बातम्या आणखी आहेत...