आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी भरीव मदत द्या- संमेलनाचे स्वागताध्यक्ष कमलकिशोर कदम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना म्हणावे तेवढे आर्थिक साहाय्य देत नाहीत, ही सरकारची उदासीन भूमिका असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने भरीव मदत दिली पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, असे प्रतिपादन दैनिक "लोकपत्र' आयोजित ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी केले.
नांदेड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणावर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना कमलकिशोर कदम बोलत होते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हा उदात्त हेतू समोर ठेवून मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या वेळी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष कमलकिशोर कदम, मावळते अध्यक्ष भारत सासणे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे, सौ. लतिका कदम, अभिनेत्री मधू कांबीकर, दै.लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक, प्राचार्या डॉ. गीता लाठकर, न्या. बी.एन. देशमुख, कार्यवाह कुंडलिक अतकरे, नांदेड मसापचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अंबाजोगाईयेथे मराठी विद्यापीठ स्थापन करा : ठाले पाटील
मराठवाडासाहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, समाजाच्या समस्या सोडवण्याचे काम या साहित्य संमेलनात केले जात आहे. मराठवाडा ही मराठीची जन्मभूमी आहे. त्यामुळे मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. रवींद्र तहकीक यांनी संमेलनाविषयी भूमिका स्पष्ट केली.
इंग्रजीशाळांत मराठी भाषा सक्तीची करा : संमेलनाध्यक्ष देशमुख
मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवायची असेल, तर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी भाषेचा अभ्यासक्रम सक्तीचा केला पाहिजे, तरच मराठी भाषा टिकेल, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. नांदेड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.