आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनी व्यक्ती मते मागते, कधी मिळणार ओमराजेंना न्याय? - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - आमदार असलेल्या जळगावच्या सुरेश जैनांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सव्वा वर्षापासून तुरुंगात टाकले आहे. मात्र, खुनाचा आरोप असलेल्या पद्मसिंह पाटलांना वेगळा न्याय कशामुळे, असा सवाल करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर चौफेर टीका केली. पवनराजे खून प्रकरणाचा आरोप असलेले पद्मसिंह पाटील तुमच्या दारात मत मागायला येत आहेत. तुम्ही त्यांना मत देऊन तुमचा स्वाभिमान गहाण टाकू नका, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.
महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. शहरातील राजे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील मैदानावर मंगळवारी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार रामदास आठवले, आमदार विनायक मेटे, सुभाष देसाई, नीलम गोर्‍हे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत तुम्ही खूप भोगले आहे. तुम्ही तुळजाभवानी मातेच्या जिल्ह्यातले नागरिक आहात, आता सहन करू नका. पवनराजेंचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणात ओमराजेंना न्याय कधी मिळणार आहे? भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आमदार सुरेश जैन सव्वा वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांना राज्य सरकार बाहेर येऊ देत नाही. मात्र, पवनराजे खून प्रकरणाचा आरोप असलेल्या पद्मसिंहाना सरकार वेगळा न्याय का देत आहे? त्यांनाही तुरुंगातच ठेवा. जो न्याय जैनांना लावला जातो, तो न्याय पद्मसिंहांना का नाही? जैन हे आमदार आहेत. बाहेर आले तर भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करतील, असा सरकारला संशय आहे. मग, पुरावे नष्ट करणार्‍या पद्मसिंहांना कोण अडवणार? पद्मसिंह पाटील यांनी स्वत:च्या संस्था काढून कारखाना, सहकार संस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. दरम्यान, खासदार रामदास आठवले यांनी मराठवाड्यातील आठही जागा महायुतीच्या ताब्यात येतील, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली.

पुढील स्लाइडमध्ये, गुजरात दंगलीत पुढे - आर. आर