आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मराठवाड्याचा अपमान झाल्याने पद सोडले’ ; नाथा चितळे यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - ‘मराठवाड्यावर अन्याय करण्याची भूमिका केवळ राज्यकर्त्यांचीच नाही तर सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करीत आहेत. मोहन जोशी यांच्या अध्यक्षपदी निवडीला आम्ही पाठिंबा दिला. मात्र, त्यांनी आश्वासन देऊनही मराठवाड्यातील एकाही कलावंताला कार्यकारिणीवर घेतले नाही. त्याचा निषेध म्हणून व मराठवाड्याचा स्वाभिमान कायम राखण्यासाठी मी नाट्य परिषदेच्या नांदेड कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे’, अशी प्रतिक्रिया नाट्य कलावंत नाथा चितळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
‘मराठवाड्यात तीस वर्षांपासून नाट्य परिषदेचे काम सुरू आहे; परंतु या भागाला कधीच प्राधान्य मिळत नाही. या वेळी मोहन जोशी यांनी सहकार्यवाहपद मराठवाड्याला देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मी जोशींच्या बाजूने मतदान केले, परंतु ज्यांचा नाट्य चळवळीशी काडीचाही संबंध नाही, अशा लोकांना जोशींनी पदे वाटली. पिंपरीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना सहकार्यवाहपद तर नागपूरचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भुसारी यांना उपाध्यक्षपद दिले. मुंबईचे दीपक करंजीकर यांना कार्यवाह केले. या लोकांचा नाट्य चळवळीशी काय संबंध ? केवळ राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पदे वाटण्यात आली, असा आरोपही चितळे यांनी केला.

काम चालूच राहील
मराठवाड्यात नांदेड आणि बीड अशी दोन मते होती. या दोघापैकी कोणालाही पद दिले असते तरी हरकत नव्हती, परंतु मराठवाड्याला डावलून त्यांनी या भागाचा अपमानच केला. या अपमानामुळेच मी राजीनामा दिला. मात्र माझे नाट्य चळवळीचे काम यापुढेही चालूच राहील,’ असे चितळे यांनी सांगितले.