आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात चौथ्या दिवशीही संततधार, वाचा जिल्‍हानिहाय परिस्‍थिती, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील बहुतांश भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यानंतर आता चौथ्या दिवशी जिल्ह्याच्या मध्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीला काठोकाठ पाणी आले. याशिवाय जिल्ह्यातून वाहणारी दुसरी मोठी नदी आसनाही दुथडी भरून वाहू लागली. नांदेड, परभणी, जालना आणि बीडला सूर्यदर्शनही झाले नाही.
हिंगोली : चौथ्या दिवशी नदीला पाणी
हिंगोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत एकूण १३७.८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात सरासरी २७.५७ मिलिमीटर नोंद झाली, तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३०२.२१ झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत सोमवारी अखेर पडलेल्या पावसाचे हे प्रमाण ३३.९४ टक्के आहे. पाऊस कमी प्रमाणात होत असल्याने गेल्या तीन दिवसांत नदी, ओढ्यांना पूर आला नाही, परंतु सोमवारी सकाळपासून मात्र येथून वाहणारी कयाधू नदी दुथडी भरून वाहू लागली, तर जिल्ह्यातून वाहणारी दुसरी मोठी नदी आसनासुद्धा सकाळपासूनच काठोकाठ भरून वाहत आहे. या नद्यांच्या पाण्याचा जिल्ह्यासाठी जास्त फायदा होत नाही. जिल्ह्याला मिळणारे पाणी विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा आणि हिंगोली-परभणी जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवर असलेल्या धरणातून येते.
परभणी : सूर्यदर्शन नाही
संततधारेमुळे सलग तिसऱ्या दिवशीही सूर्यदर्शन घडले नाही. सोमवारी दिवसभर संततधार सुरूच होती. आतापर्यंत १९६.६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ती सुमारे २६ टक्के आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाल्यांना पाणी आले आहे. जुलैच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेला हा पाऊस भिजस्वरूपात अाहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, उस्‍मानाबाद, जालना, नांदेड, लातूर व बीड जिल्‍ह्यातील स्थिती..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...