आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड जिल्ह्यात खड्डयामुळे बसमध्येच प्रसूती; बाळ दगावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - तपासणीसाठी जाताना रस्त्यावरील खड्डय़ात बस आदळल्याने गर्भवती महिला सोमवारी बसमध्येच प्रसूत झाली असून, यात नवजात बाळाचा मृत्यू झाला. मोगरा-माजलगाव मार्गावर ही हृदयद्रावक घटना घडली.

नऊ महिन्यांच्या गर्भवती शोभा अनिल बाणाईत (30, मोगरा) या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नातलगासह बसने (एमएच 20, 0203) दुपारी बाराच्या सुमारास माजलगावकडे निघाल्या. मोगर्‍यापासून 4 कि.मी.वर बस खड्डय़ात आदळली. शोभा यांना प्रसववेदना सुरू झाल्या. काही वेळाने बसमध्येच त्या प्रसूत झाल्या. प्रवाशांनी त्यांना माजलगावच्या काकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, बाळाचा वाटेतच मृत्यू झाला. सुमारे 3 कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या या रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, आगारप्रमुख म्हणतात बसमध्ये प्रसुती नित्याची बाब.
अंबाजोगाईत स्त्री अर्भक सापडले, माता फरार