आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मसापचे साहित्य संमेलन यंदा सोयगावात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३८व्या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीची बैठक बुधवारी (दि. २३) अजिंठा शिक्षण संस्थेच्या कै. बाबूरावजी काळे सभागृहात झाली. बैठकीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साहित्य संमेलनाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. या वेळी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. भाऊसाहेब गाडेकर यांची निवड करण्यात आली.

सोयगाव येथे डिसेंबर महिन्यात दि. २७ ते २९ या तीन दिवस चालणाऱ्या ३८ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा शिक्षण संस्थेच्या आवारात हे संमेलन अध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे, उद््घाटक दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या पार्श्वभूमीवर दि. २३ नोव्हेंबर रोजी पूर्वतयारीची बैठक प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेत झाली. यासाठी विविध २० समित्या स्थापन करण्यात आल्या व जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गाडेकर, प्रा. श्रीकृष्ण परिहार यांच्या नेतृत्वात मसापचे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
बातम्या आणखी आहेत...