आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात सर्वदूर रिपरिप, उशिरा का होईना वरुणराजा बरसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत वरुणराजा बरसत आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 13.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. या विभागात आतापर्यंत सरासरी 148.05 टक्के पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या (779 मि.मी.) हा पाऊस 19.06 टक्केच आहे. दोन दिवसांपासूनच्या जोरदार पावसामुळे औंढा नागनाथ मंदिरात पाणीच पाणी जमा झाले होते.
मराठवाड्यातील औरंगाबादचा अपवाद वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यात अद्यापही वार्षिक सरासरीच्या 25 टक्के पाऊस झालेला नाही. सोमवारी रात्री औरंगाबादमध्ये सरासरी 10.36 मि.मी.पावसाची नोंद झाली. नांदेड, हिंगोली, परभणी व जालना या जिल्ह्यांत तर अद्यापही वार्षिक सरासरीच्या केवळ 15-16 टक्केच पाऊस झाला. नांदेडमध्ये सोमवारी पावसाने थोडा जोर पकडला. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यत जिल्ह्यात एकूण 333.32 मि.मी. नोंद झाली.
जालन्यात सर्वदूर रिमझिम
15 दिवसांपासून दडलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी पुनरागमन केले. मंगळवारी दिवसभर सर्वदूर रिमझिम सुरू होती. जिल्ह्यात 5 ऑगस्टपर्यंत 16.25 टक्के सरासरी पाऊस झाला. यात 5 ऑगस्टची सरासरी 7.36 मि.मी. एवढी आहे. आतापर्यंत सरासरी 111.87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोलीत चांगला पाऊस-

जिल्हाभरात सोमवारपासून चांगला पाऊस होत असून सोमवार ते मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत सरासरी 22 मिमी पावसाची नोंद झाली. औंढा नागनाथ तालुक्यात सर्वाधिक 43 मिमी पाऊस झाला असून त्यानंतर वसमतमध्ये 31 मिमीची नोंद झाली. हिंगोलीत सर्वात कमी 8, कळमनुरीत 17 तर सेनगाव तालुक्यात 12 मिमी पाऊस झाला. मंगळवारीही शहरात पाऊस चालूच होता. त्यामुळे पिकांना तूर्त जीवदान मिळाले आहे.
प्रकल्प पातळी टक्के (दलघमी)
जायकवाडी 201 9.55
येलदरी 317.91 39.28
सिद्धेश्वर 00 00
विष्णुपुरी 10.71 13.26
अप्पर मानार 19.71 26
लोअर मानार 22.85 16.53
इस्लापूर 416.47 43