आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरूरमध्ये आढळला अतिदुर्मिळ मारबल्ड बलून बेडूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत असलेला आणि अत्यंत दुर्मिळ म्हणून नोंद असलेला मार्बल्ड बलून फ्राॅग हा बेडूक शिरूर येथे सोमवारी प्राणिमित्र सिद्धार्थ सोनवणे यांना तो आढळला. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड डाटा बुकमध्ये याची संकटग्रस्त म्हणून नोंद आहे.

बाह्यरूप : आकार ५५ मिमी. तोंडाचा भाग आखूड व गोलाकार. चारही पाय आखूड. पोट फुगलेले असल्याने आकार गारगोटीसारखा दिसतो. अंगावर गडद तपकिरी, पिवळसर रंगाची नक्षी. पोटाचा भाग पांढरा निळसर.

संशाेधन व्हावे
हा दुर्मिळ बेडूक असून त्यावर अधिक संशोधन झाल्यास भूगर्भातील पाण्याचा शोध घेणेसुद्धा सुकर होईल. - सिद्धार्थ सोनवणे, वन्यजीव अभ्यासक, शिरूर
बातम्या आणखी आहेत...