आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्च एंडला १३ हजार ४०१ कोटी रुपये अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- फडणवीस सरकारचा ‘मार्च एंड' यंदा जोरात साजरा झाला. मार्च एंडच्या शेवटच्या चार दिवसांत विविध अनुदाने, कामांची ५८ हजार बिले सादर झाली. त्याचे पैसे देण्यासाठी ४१० आदेश पारित झाले आणि त्या आदेशाने एकाच दिवशी १३ हजार ४०१ कोटी ७९ लाख ५० हजार ३८ एवढी रक्कम अदा केली. विशेष म्हणजे यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीचा समावेश नाही; अन्यथा हा आकडा आणखी वाढला असता.
मार्च एंड हा मंत्रालयासह सरकारी कार्यालयातला एक अभूतपूर्व सोहळा असतो. प्रशासकीय कामकाजाचा वेग शेवटच्या चार दिवसांत प्रचंड वाढलेला असतो. या वर्षी तर आमदार बच्चू कडूंनी मारहाण केल्याच्या आरोपावरून मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या काम बंद आंदोलनाचाही या वेगाला फटका बसू शकला नाही. मार्च महिन्याच्या चार दिवसांत तब्बल ४१० जीआर काढण्यात आले. त्यातील ९० टक्के आदेश हे केवळ बिले अदा करण्याच्या संबंधातील होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाला आरटीजीएस प्रणालीने रक्कम दिली जात असल्यामुळे तो विभाग वगळता उर्वरित विभागाची १३ हजार काेटींची बिले ३१ मार्च या एकाच दिवशी सादर करून पैसेही अदा करण्यात आली. क्रिकेट सामन्यात सुरूवातीचे ओव्हर टुकू टुकू खेळून काढायचे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धुमधडाक्यात फटके मारून धावा जमवायच्या आणि सामना खिशात टाकायचा, असा हा प्रकार आहे. सामना जिंकला की सुरूवातीच्या षटकात धावा का काढल्या नाहीत हा प्रश्न सामना जिंकल्याच्या जल्लोषात प्रेक्षक विचारीत नाहीत अगदी तसेच कामे पूर्ण- अपूर्ण असली तरी त्याची पडताळणी करायची नाही. आणि शेवटच्या चार दिवसात अर्थपूर्ण व्यवहारातून धडाधड बिले काढायची, असा हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे. सरकारं बदलली तरी या दरवर्षीच्या कार्यक्रमात आजवर खंड पडलेला नाही. त्यामुळे मंञी काहीही म्हणत असले तरी खरं सरकार मंञालयात बसलेले बडे बाबू चालवतात हेच यावरून स्पष्ट होतं. त्याचबरोबर सरकारवर मोठा कर्जाचा डोंगर असल्याने तिजोरीत खडखडाट असतो. कंञाटदारांची बिले अदा करायची असतील तर करदात्यांकडून जमा होणा-या पैशाची वाट पाहावी लागते. आयकराची आणि व्हॅट कराची रक्कम शेवटच्या दिवशी भरण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो. हे पैसे जमा होण्यापूर्वी सगळी बिले तयार ठेवली जातात. करांचे पैसे तिजोरीत जमा होऊ लागले की बिलाच्या रकमा अदा केल्या जातात. त्यामध्ये आपल्या बिलाला प्राधान्यक्रम मिळावे यासाठी मंञालयाभोवती ' सोनेरी टोळ्या' जाळे टाकून बसलेल्या असतात.