आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी : तुम भी देखो आँखों से, हम भी आये लाखों से; अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ आक्रोश मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी मांडताना तुम भी देखो आँखों से, हम भी आये लाखों से, जय भीमच्या घोषासह विविध रंगांच्या झेंड्यांनी लाखोंचा आक्रोश मोर्चा सोमवारी (दि. १७) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीच्या वतीने मागील महिनाभरापासून सुरू असलेला आक्रोश मोर्चा सोमवारी लाखो दलित, आदिवासी, ओबीसी व मुस्लिम समाजाच्या सहभागाने शनिवार बाजार येथून सोमवारी दुपारी एकच्या सुमारास काढण्यात आला. शनिवार बाजारच्या मैदानावर मोर्चेकऱ्यांना जागा अपुरी पडल्याने जिल्हाभरातून जसे जसे दलित समाजबांधव दाखल होत होते त्याप्रमाणे मोर्चा निघाला. नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. शिवाजी पुतळ्याजवळ उभारलेल्या व्यासपीठावरून नेतेमंडळींनी विचार मांडले.

मोर्चाच्या आरंभास महामानवांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. सुरुवातीस महिला, त्यानंतर पुरुष मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले. हातात मागण्यांचे फलक व घोषणा देत मोर्चेकरी मार्गस्थ झाले. शालेय विद्यार्थिनीने मोर्चास सुरुवात करण्यापूर्वी अाक्रमकपणे भावना व्यक्त केल्या. निळे, हिरवे, पिवळे, लाल असे विविध पक्ष- संघटनांचे झेंडे घेऊन मोर्चेकरी घोषणा देत होते. मोर्चापाठोपाठ स्वयंसेवक रस्ता स्वच्छ करण्याचे काम करत होते.

मुलींनीच दिले निवेदन
मोर्चाची भूमिका शालेय विद्यार्थिनींनी मांडली. त्यात आयुषी पंडित, सांची शेळके, शाश्वती मकरंद, अनुष्का मकरंद, क्षितिजा मुळे, साक्षी मोडक यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले.
बातम्या आणखी आहेत...