आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव, धारूरमध्ये पोलिसांचा छापा, ४३ हजारांचा गांजा जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव /धारूर - माजलगाव व धारूर येथे पोलिसांनी छापा मारून ४३ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगावमध्ये एकास अटक केली आहे.

माजलगाव येथील गजानन मंदिर रोडवरील शेख सलीम शेख दाऊद हा गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईत ३३ हजार आठशे रुपयांचा सहा हजार सातशे साठ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. शेख सलीम शेख दाऊद हा राहत्या घरी गांजाची विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांच्या पथकाला मिळताच गुरुवारी रात्री ८ वाजता पोलिसांनी छापा मारून गांजा जप्त केला. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक अशोक धोंडिबा पवार यांच्या तक्रारीवरून शेख सलीम शेख दाऊद याच्या विरोधात येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
धारूरमध्येही छापा
धारूरमध्ये पोलिसांनी छापा मारून खंडू शिवलिंग साळुंखे याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा पावणेदोन किलो ओलसर गांजा छापा मारून जप्त केला आहे. दरम्यान, खंडू साळुंखे विरुद्ध धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक गजानन तडसे करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...