आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Market Committee Election:16 Candidates Were Elected Unopposed

बाजार समिती निवडणूक : १६ उमेदवार बिनविरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातुर- चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत १८ पैकी १६ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून २ जागांसाठी चार उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. ९ ऑगस्टला मतदान होणार आहे. ही माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एम. एस. लटपटे यांनी दिली.

बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये सोसायटी मतदार गटातून राजेश्वर मोटे, भुजंगराव केंद्रे, पांडुरंग भोसले, गुंडू जानवळकर, सुनील मनाळे, उद्धव बिराजदार, माधव लवटे, ओबीसी प्रर्वगातून अशोक चिंते, विमुक्त जातीमधून दयानंद सुरवसे, महिला गटातून सरोजा पस्तापुरे, मंगल सुमठाणे, अनुसूचित जातीमधून रोहिदास वाघमारे, हमाल-मापाडी मतदारसंघातून अंकुश मोतेराव, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून शिवराणी बिडवे तर व्यापारी मतदार गटातून संजय पाटील, ज्ञानोबा धोंडगे या १६ जणांचा समावेश आहे.