आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकवणाराच बाजारात विकू लागल्याने भाज्यांचे भाव कुठे पडले, तर कुठे चढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- राज्यभर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांच्या संपावरून वादंग सुरू असताना मराठवाड्यात मात्र औरंगाबाद वगळता उर्वरित मराठवाड्यात या संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपल्या मालाला स्थानिक आठवडी बाजार, शहरातील भाजी मंडई आदी पर्याय शोधून ठेवलेले आहेत. त्यामुळे राज्यभर व्यापारी संपात असताना मराठवाड्यात मात्र शेतकरी बाजारात अापला भाजीपाला व इतर माल विकत असल्याचे चित्र दिसत होते.

शेतमाल नियमनमुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी पाच दिवसांपासून बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. या संपामुळे पश्चिम महाराष्ट्र व मुंबईत हाल होताना दिसत असताना यापासून मराठवाड्यातील शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्राहक मात्र अलिप्त होता. याचे कारण म्हणजे या भागातील पूर्वापार चालत आलेली आठवडी बाजाराची परंपरा होय. या भागातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला जवळपासच्या आठवडी बाजारातच जाऊन स्वत: अथवा तेथील व्यापाऱ्यांमार्फत विकतात. त्यामुळे ९० टक्के शेतकरी बाजार समितीकडे फिरकतच नाहीत. अनेक जणांचे बाजार समित्यांच्या बाहेरच व्यवहार होतात. त्यामुळे मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये भाजीपाला अथवा फळांची आवक असणारी मोठी बाजार समितीच नाही. त्यामुळे संपाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर तसेच नागरिकांवरही कोणताच ताण पडलेला नाही. कारण मराठवाड्यात आठवडी बाजारातूनच भाजी खरेदी करण्याचा कल असतो.
आठवडी बाजारांचे मजबूत जाळे
मराठवाडा भागात परंपरेने आठवडी बाजारांचे विस्तारित व मजबूत जाळे तयार झालेले आहे. आजच्या परिस्थितीत उस्मानाबादसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणीही प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो. अशाच प्रकारे मराठवाड्यात असे शेकडो आठवडी बाजार दररोज ग्रामीण भागात भरत असतात. त्यामुळे शेतकरी आपला माल त्या-त्या वारी जवळच्या बाजारात जाऊन विक्री करताना दिसून येतो. काही नियमित व्यापारी व शेतकऱ्यांच्या स्वत:चा माल विक्री करण्याच्या पद्धतीमुळे संपाचा परिणाम जाणवला नाही.
पुढे वाचा, सव्वाशेवर समित्यांची मदार कापूस, धान्यावरच..
सरकारने पर्यायी व्यवस्था न केल्याने सर्वांचाच गोंधळ
बातम्या आणखी आहेत...