आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नातील मानपानाला फाटा; चारा छावणीला दिली मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता येथील कैलास गलांडे पाटलांनी मुलीच्या लग्नातील मानपानाच्या खर्चाला फाटा देत परिसरातील जनावरांच्या चारा छावणीसाठी 11 हजार रुपयांची मदत दिली. या घटनेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

लासूर स्टेशन येथील कैलास गलांडे यांच्या मुलीचे लग्न शनिवारी र्शीधर माधवराव झारेकर यांच्या मुलाशी झाले. लग्न समारंभात पाहुण्यांच्या मानपानावर होणार्‍या खर्चास फाटा देत टाकळी कदीम (ता. गंगापूर) येथील चारा छावणीस 11 हजारांचा धनादेश सरपंच संतोष पुरे व गिरजानाथ भवर यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. मानपानात टॉवेल, टोपी, फेटा, आहेर, सत्कार आदी खर्च टाळून दुष्काळाशी झगडणार्‍या शेतकर्‍यांच्या जनावरांना मदत केल्याचे कैलास गलांडे यांनी सांगितले. गलांडे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.