आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्‍हाडाचा मेटॅडोर उलटला; 29 जण जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन- औरंगाबाद - पैठण रोडवरील कौडगाव वळणावर बालानगर येथील वर्‍हाडाचा मेटॅडोर उलटून 29 जण जखमी झाले. त्यातील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बालानगर येथील रहिवासी रामनाथ गोर्डे यांच्या मुलाच्या लग्नासाठी वर्‍हाडी बालानगरहून मेटॅडोरने (एमएच 20 सीटी 419) कांचनवाडी येथे गेले होते. लग्न लागल्यानंतर बालानगरकडे परतताना कौडगाव येथील वळणावर मेटॅडोरने पायी चालणाºया पद्मा अंबादास जाधव (रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) या महिलेस धडक दिली. यानंतर चालकाचा मेटॅडोरवरील ताबा सुटून तो उलटला. 29 जण जखमी झाले. जखमींवर बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून सोपान फोपसे, शंकर चव्हाण, श्रीरंग लासुरे, अजय गोर्डे, गणेश गोर्डे, बळीराम गोर्डे यांच्यासह पद्मा जाधव या गंभीर जखमी झालेल्यांना घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.