आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्‍ये वीज तार अंगावर पडून विवाहीतेसह भाच्‍याचा मृत्‍यू, 27 दिवसांपूर्वी झाला होता विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
बीड- माहेरी आलेल्‍या विवाहितेसह भाच्याच्‍या अंगावर वीजेची तार कोसळल्याने दोघांचाही वीजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याची घटना बीडमधील नाळवंडी येथे मंगळवारी दुपारी घडली.
 
तालुक्यातील नाळवंडीपासून जवळच असलेल्या मौज तलावाजवळ सखाराम काळे हे शेतवस्तीवर कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांची विवाहित मुलगी मीरा मनोज यादव (वय २०) ही आठ दिवसांपूर्वी माहेरी आली होती.  मंगळवारी दुपारी घरासमोरील अंगणात तीन वर्षाचा भाच्चा सत्यम नारायण काळे याला त्‍या खेळवत होत्‍या. तेव्‍हाच अचानक वादळी वाऱ्याने घरासाेरील वीजेच्या खांबावरील तार तुटुन दोघांच्या अंगावर पडल्‍या. यात विजेच्या धक्क्याने दाेघांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी ते जिल्हा रूग्णलयात पाठवण्‍यात आले आहेत.

मिराचा २७ दिवसांपूर्वी झाला होता विवाह
मिरा हीचा विवाह १७ मे २०१७ रोजी धारूर तालुक्यातील धुनकवड येथील मनोज यादव यांच्यासोबत झाला होता. मिराने शिक्षणशास्त्राची पदवी पूर्ण केली होती तर पती  मनोज यादव हे औरंगाबादेत कंपनीत करत आहे. मिरा ही आठ दिवसापूर्वीच माहेरी आली होती.
 
पंधरा दिवसांपासुन वीज तारा पडण्याचे सत्र
पिंपळनेर ठाण्याच्या हद्दीत म्हाळसापूर येथे अाठ दिवसापूर्वीच दाेन सख्या भावांचा वीज तारेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. पिंपळादेवी व बाेरदेवी येथे दोन म्हशीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. १५ दिवसापासून ठाण्याच्या हद्दीत विद्युत तारा पडण्‍याच्‍या घटना घडत असुन या बाबत वीज अधिकाऱ्यांना सूचना देऊनही दखल घेतली गेली नाही असे सहायक पाेलिस निरक्षक गाजनन जाधव यांनी ‘दिव्य मराठी’ शी बाेलताना सांगितले.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, आष्‍टी तालुक्‍यात दुचाकी घसरून पडल्याने हमाल ठार...
बातम्या आणखी आहेत...