आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडवणी तालुक्यातील विवाहित महिलेचा खून; कान्हापूर येथील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमा परमेश्वर चव्हाण - Divya Marathi
रमा परमेश्वर चव्हाण
बीड - शौचास गेलेल्या नवविवाहितेचा गळा कापून खून करण्यात आल्याची घटना वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथे सोमवारी घडली. दरम्यान, आष्टी येथील तरुणीच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच वडवणी तालुक्यातही तरुणीची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कान्हापूर येथील रमा परमेश्वर चव्हाण (२२) या पाच महिन्यांपूर्वीच विवाह झालेली विवाहिता दुपारी शौचास गेली असता बराच वेळ परत न आल्याने नातेवाइकांनी शाेधाशोध केली. त्या वेळी गावाजवळच रमाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. रमा यांचा एप्रिलमध्येच परमेश्वर चव्हाण यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यान, घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हत्या झालेल्या विवाहितेवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. घटनेनंतर अंबाजोगाईचे अप्पर पोलिस अधीक्षक मारुती कराडे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.