आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्‍ये विवाहितेची आत्महत्या, खुनाचा केला आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- निलंगा तालुक्यातील नदी हत्तरगा येथे विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे करण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी कासारशिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वर्षाराणी शिवशंकर तिप्पनबोणे (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. ती निलंगा तालुक्यातील हसली हत्तरगा येथील रहिवासी होती. वर्षभरापूर्वी तिचा विवाह नदी हत्तरगा येथील शिवशंकर तिप्पनबोणे याच्याशी झाला होता. 

मंगळवारी रात्री तिने घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु सकाळी तिच्या माहेरकडील मंडळीने वर्षाराणीचा खून झाल्याच्या आरोप केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृताच्या नातेवाइकांनी सासरकडील मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. परंतु पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी कासारशिरसी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार राठोड यांनी सांगितले की, अद्याप याप्रकरणी लेखी फिर्याद दाखल झाली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई 
करण्यात येईल. 
बातम्या आणखी आहेत...