आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपाक येत नसल्याने विवाहितेचा केला खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- तालुक्यातील धनेगाव येथे शनिवारी रात्री स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा खून करण्यात आला. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपाली सचिन धडे (२१) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती विठ्ठल ऊर्फ सचिन बालाजी धडे हा तिला अनेक दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून त्रास देत होता. शनिवारी रात्री त्याने तिला भाजी करता येत नाही, स्वयंपाक चांगला करत नाही म्हणून तिचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला. याप्रकरणी मृत दीपालीचे वडील आनंद मेकले यांनी पोलिसांत फिर्याद िदली आहे. त्यावरून सचिन धडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती कळल्यानंतर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक मिलिंद खोडवे, सहायक पोलिस निरीक्षक सय्यद आदींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सपोनि सय्यद करत आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, बैलगाडीसह विहिरीत पडून शेतमजुराचा मृत्यू
बातम्या आणखी आहेत...