आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Married Women Suicide With Two Child At Ambad District

विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडीगोद्री- अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे माहेरी आलेल्या मातेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजता उघडकीस आली. अलका रेवनाथ राजगुरू (25) व प्रदीप (अडीच वर्षे), पूजा (सहा महिने) अशी मृतांची नावे आहेत.
अलका हिचे 2006 मध्ये रेवनाथ राजगुरू (भातकुडगाव फाटा, ता. शेवगाव, जि. नगर) याच्यासोबत लग्न झाले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. दरम्यान, एक महिन्यापूर्वी अलका ही दोन मुलांसह माहेरी आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आली होती. त्यानंतर पती रेवनाथ राजगुरू हा मुलांना भेटण्यासाठी आला होता. सासरच्या मंडळींनी थांबण्याचा आग्रह धरल्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून तो येथेच होता. शुक्रवारी पहाटे 4 वाजेदरम्यान दोन्ही मुलांना शौचास घेऊन जात असल्याचे सांगून अलका घराबाहेर पडली. त्यानंतर सकाळी 6 वाजता ग्रामस्थ गावाजवळच असलेल्या नारायण दवणे यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले. त्या वेळी सहा महिन्यांची पूजा पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आले. सरपंच राजू घाडगे व उपसरपंच दिगंबर आदलिंगे यांनी गोंदी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत्यूनंतर प्रदीप कुशीतच
सहा महिन्यांची पूजा पाण्यावर तरंगत होती. मात्र, मृत अलका व अडीच वर्षांचा प्रदीप गाळात फसले होते. या वेळी प्रदीप हा आईच्या कुशीत घट्ट बिलगलेला होता.

सासरची परिस्थिती जेमतेम
अलका हिच्या सासरची परिस्थिती जेमतेम होती. पती रेवनाथ हा शेवगाव येथे सुतारकाम करून घर चालवत असे. शिवाय, अलका हीसुद्धा मजुरी करत होती.