आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगावात भाजप आमदारांच्या घरावर फेकल्या विटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 माजलगाव- पराभवामुळे स्वपक्षातील कार्यकर्त्यांनीच माजलगावचे  भाजप आमदार आर.टी. देशमुख यांच्या बँक काॅलनीतील निवासस्थानावर दोन वेळा विटा फेकत साहित्याची मोडतोड केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या घटनेमुळे शुक्रवारी दिवसभर आमदार देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त होता. नगर परिषद निवडणुकीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व आमदार देशमुख यांच्यात धुसफूस सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतसुध्दा कार्यकर्त्यांत मतभेद होते. 
बातम्या आणखी आहेत...