आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेचे प्रत्येकी दोन पालिकांवर वर्चस्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी : जिल्ह्यातील सात पालिकांत सोनपेठ व गंगाखेडमध्ये कॉंग्रेसने, पाथरी व जिंतुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने, तर पूर्णा व मानवत पालिकेवर शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. सेलूत मात्र माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी स्वबळावर पॅनल उभे करून नगराध्यक्षपदी स्वत: निवडून येण्याबरोबरच १२ जागांवर नगरसेवकांना निवडून आणत काँग्रेसला जोरदार धक्का दिला. पूर्णा व मानवत पालिकेवर शिवसेनेच्या उमेदवारांनी निसटता विजय संपादन करीत प्रथमच सत्ता हस्तगत केली. पाथरी पालिकेत सर्वच्या सर्व २० जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे काम राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केले.
जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांच्या प्रतिष्ठेची व चुरशीच्या ठरलेल्या या पालिका निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत नेतेमंडळींचा कस लागला. सत्तापरिवर्तनाचा फटका प्रामुख्याने माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना मोठ्या प्रमाणावर बसला.
यांनी गमावले :
- गंगाखेडचे राष्ट्रवादीचे आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांना मोठा फटका, नगराध्यक्षपदी चिरंजीव पाचव्या स्थानावर.
- माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांचे जिंतूर व सेलूत पानिपत
-जि.प.अध्यक्ष राजेश विटेकरांना सोनपेठमध्ये धक्का भाजपचा गंगाखेडसह जिल्ह्यात दारुण पराभव, केवळ चारच जागा पदरात
यांनी कमावले :
- आमदार बाबाजानींची पाथरीत एकहाती सत्ता
- आमदार विजय भांबळेंचे होमपिचवर जिंतुरात वर्चस्व
-आमदार मोहन फड यांचा मानवतमध्ये सत्तेचा करिष्मा.
बातम्या आणखी आहेत...