आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत काँग्रेस-राष्ट्रवादीतून शिवसेनेत इनकमिंग सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रवी पतंगे-देशमुख यांच्या झालेल्या प्रवेशापाठोपाठ शनिवारी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे, काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनिता जैस्वाल यांचे पती प्रभाकर जैस्वाल यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.
  
आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रयत्नाने शहरासह तालुक्यातील अनेक दिग्गजांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले असून यात प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने पक्षात दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी चपराक बसू लागली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रवी पतंगे यांच्यापाठोपाठ या दोघा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्हा परिषदेच्या तीन मतदारसंघांतील शिवसेनेचे उमेदवार निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्याबरोबरच जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष गोपीराज काळे यांनी काँग्रेसमधून प्रवेश केला. टाकळीचे सरपंच विनायक सामाले, भुजंग सामाले, पंचायत समितीचे माजी सदस्य राधाजी पारधे आदींनी प्रवेश केला.
बातम्या आणखी आहेत...