आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टमटम रिक्षामधून पडून वैद्यकीय अधिकारी ठार, रिक्षाचालकाने करकचून ब्रेक लावल्याने अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बीडहून गेवराईकडे निघालेल्या रिक्षाचालकाने जोराचे ब्रेक लावल्याने रिक्षात बसलेल्या वैद्यकीय अधिकारी रूपाली केंडे महामार्गावर पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने ठार झाल्या. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शहराजवळील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ घडला.

बीड शहरातील धोंडीपुरा भागातील रहिवासी असलेल्या डॉ. रूपाली सुहास केंडे या मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या आरोग्य विभागाच्या टोल फ्री असलेल्या रुग्णवाहिकेवर कार्यरत होत्या. मंगळवारी सकाळी गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे रुग्णवाहिका थांबवल्याने त्या जालना रोडवरून रिक्षाने मादळमोहीकडे निघाल्या. वाटेत नामलगाव फाट्याजवळ रिक्षाचालकाने जोराचा ब्रेक लावल्याने त्या रोडवर कोसळल्या. डोक्याला व छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. केंडे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.