आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Super Cop Of Maharashtra Police Kishor Dange

जालन्‍याच्‍या या सुपरकॉपपुढे अनेकांना फुटतो घाम; वाचा संपूर्ण माहिती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र पोलिसातील जवान किशोर डांगे आपल्या एका फॅनबरोबर. - Divya Marathi
महाराष्ट्र पोलिसातील जवान किशोर डांगे आपल्या एका फॅनबरोबर.
जालना - येथील पोलिस दलात शिपाई असलेल्‍या किशोर डांगे या सुपरकॉप युवकाला 'अरनॉल्ड' या टोपन नावाने ओळखले जाते. किशोरने महाराष्‍ट्राचे नाव राष्‍ट्रीयच नव्‍हे आंतराष्‍ट्रीय पातळीवर उज्‍ज्‍वल केले. आज divyamarathi.com 'प्राइड ऑफ महाराष्ट्र' या मालिकेमध्‍ये किशोर याच्‍या कतृत्‍वाविषयी माहिती देणार आहे.
आंतराष्‍ट्रीय स्‍पर्धेत जिंकले पदक
किशोर हा मूळ सांगली जिल्‍ह्यातील आहे. नौकरी करताना त्‍याने बॉडी बिल्डिंगची आपली आवडही जपली आहे. त्‍यातून राष्‍ट्रीय आणि आंतराष्‍ट्रीय स्‍पर्धेत अनेक पदकं मिळवलीत. गत वर्षी त्‍याने नॉर्थ आयरलँडच्‍या बेलफास्टमध्‍ये झालेल्‍या 'वर्ल्ड पोलिस अॅण्‍ड फायर गेम्स'मध्‍ये सुवर्णपदक जिंकले होते.
प्रतिकुल परिस्थितीत गेले बालपण
मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर मराठवाडा असे अनेक किताब किशोर यांनी आपल्या नावावर केले आहेत. त्याशिवाय ते अनेक परदेशी स्पर्धांमध्येही त्यांनी पदके पटकावली आहेत. जालना येथील एका गरीब कुटुंमध्ये जन्मलेल्या किशोरला पोलिस विभागात नोकरी मिळवण्यासाठी अनेक कष्ट घ्यावी लागली. पण हे ध्येय गाठण्यासाठी अभ्यास करतानाच त्याने बॉडी बिल्डिंगचा छंदही जोपासने सुरू ठेवले. आर्थिक तंगीमुळे अनेकदा त्याला सराव सोडवा लागला. पण पोलिसांत नोकरी मिळताच त्याने बॉडी बिल्डिंगवर लक्ष केंद्रित केले.
10 वर्षे घेतली मेहनत
पिळदार शरीर बनवण्‍यासाठी किशोरला 10 वर्षे सातत्‍याने मेहनत करावी लागली. त्‍यासाठी रोज जिममध्‍ये तासनतास घालवावे लागलेत. ड्यूटी संपल्‍यानंतर तो थेट जिममध्‍ये जातो. यासाठी त्‍याला त्‍याचे वरिष्‍ठ अधिकारीसुद्धा सहकार्य करत असल्‍याचे तो सांगतो. स्‍पर्धेसाठी जेव्‍हा त्‍याला बाहेर जायचे असते. तेव्‍हा त्‍याला सहजतेने सुटी मिळते. त्‍याला देशाबाहेरी स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी राज्‍य शासनाने अर्थसाहाय केले.
फिटनेस सेंटर सुरू करण्‍याची इच्‍छा
महाराष्ट्र पोलिस कर्मचा-यांसाठी फिटनेस ट्रेनिंग सेंटर सुरू करण्‍याची किशोर याची इच्‍छा आहे. त्‍या बाबत त्‍याने राज्‍य सरकारकडे प्रस्‍ताव पाठवला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...