बीड- दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार सहा ऑगस्ट रोजी बीडमध्ये येत असून जिल्ह्यातील विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने देश बचाओ, संविधान बचाओ उपक्रमांतर्गत त्याच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांच्या वतीने मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता शहरातील आशीर्वाद लॉन्सवर ही सभा होणार आहे. तत्पूर्वी शहरातून संविधान बचाओ रॅली काढण्यात येणार आहे. या वेळी भारतीय संविधानाचे जतन व्हावे, शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण व्हावे, मातृभाव वाढीस लागावा, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी आदी विषय हाताळले जाणार आहेत.