आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरू तरुणाकडून महिलांवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- येथील तालाबकट्टा भागातील १८ वर्षीय माथेफिरू तरुणाने सोमवारी दुपारी च्या सुमारास येथील गांधी चौकात दोन महिलांना लक्ष्य करून एकीचे नाक कापले तर एका महिलेचा ओठ कापला. परंतु आपली समाजात नाचक्की होईल या भीतीपोटी एकाही महिलेने पोलिसात फिर्याद दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही.
गांधी चौकात दुपारी तालाबकट्टा भागातील पाईकराव असे आडनाव असणाऱ्या या तरुणाने अचानक दोन महिलांवर हल्ला केला. हातातील ब्लेडने त्याने वार करून एका महिलेचा ओठ तर एका महिलेचे नाक कापले. गांधी चौकातील नागरिकांनी या तरुणाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हा तरुण पोलिसांच्या प्रश्नांना असंबद्ध उत्तरे देत होता. तसेच हल्ल्याबद्दल तो काहीही बोलत नव्हता. ओठ कापलेली महिला खासगी रुग्णालयात दाखल झाली, तर नाक कापलेली महिला येथील सरकारी रुग्णालयात दाखल झाली. या वेळी महिलेने पत्रकारांना आपले नाव सांगण्यास नकार दिला. तसेच तिच्यासोबत असलेल्या तरुणीनेही, नाक कापल्याचे समजल्यावर समाजात बदनामी होईल यामुळे गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यामुळे पीडित महिलांची नावे समजू शकली नाहीत. याबाबत शहर पोलिसात सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
बातम्या आणखी आहेत...