आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विडी कामगार महिलेचा खून, आरोपींना अटक करा’, सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांचा नांदेडमध्‍ये बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नल्लागुट्टा चाळ भागात राहणाऱ्या विडी कामगार महिला मीना नरसिमलू नक्का यांचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांच्या वतीने बंद पाळला. बंदला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळाला. 
 
मीना नक्का या २४ जानेवारी रोजी विडी कारखाना येथून घराकडे येत असताना दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे अपहरण झाले. अपहरण करून  अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला. मृतदेह नाल्यात फेकण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु आरोपींना अद्याप पकडले नाही. या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय, विविध संघटना व व्यापाऱ्यांच्या वर्गाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती.  सोमवारी सकाळपासूनच नेते व व्यापारी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  
 
बातम्या आणखी आहेत...