आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यान्ह भोजनातून १६० विद्यार्थ्यांना विषबाधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
लातूर -अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते पाचवीच्या वर्गातील १६० विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मध्यान्ह भोजनांतर्गत तेथील विद्यार्थ्यांनी खिचडी व वाटाण्याची उसळ खाल्ली. त्यानंतर काही वेळातच त्यांना मळमळ होऊ लागली व उलट्याही सुरू झाल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पालक घाबरले.
गावात दवाखान्याची सोय नसल्याने तातडीने बाधित विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनांनी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. किनगावचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांचे या कामी विशेष सहकार्य लाभले. अहमदपुरात पाच डॉक्टरांच्या टीमने उपचार केले. १६० पैकी १३६ मुलांना सुटी देण्यात आली असून २४ विद्यार्थ्यांना निगराणीखाली ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाचे
अधीक्षक डॉ. बी. एस. नागरगोजे यांनी सांगितले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...