आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईपर्यंतचा सायकलने प्रवास करून शहीदांना श्रद्धांजली, शिंगोलीचा युवक मजूर पाच दिवस सायकलवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - मुंबई येथे २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका मजूर युवकाने शहरापासून थेट मुंबईपर्यंत सायकलने प्रवास केला. प्रवासादरम्यान असलेल्या पोलिस ठाण्यातून या युवकाला मदत मिळाली.

शिंगोली (ता. उस्मानाबाद) येथील अमोल जयराम चव्हाण (२६) याला लहानपणापासूनच पोलिस अधिकारी व सैन्यदलाच्या कार्याबद्दल आकर्षण आहे. तसेच सायकल चालवण्याचाही त्याने छंद जोपासला आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांविषयी कृतज्ञता म्हणून त्याने या वेळी मुंबईला सायकलने प्रवास करून श्रद्धांजली अर्पण करण्याचा निश्चय केला. त्याला त्याचा मित्र परिवार व शहरातील प्रतिष्ठितांकडून चांगली साथ मिळाली. शहरातील ज्ञानेश्वर मंदिरापासून त्याने दि. २२ नोव्हेंबरला त्याने प्रवासाला सुरुवात केली. सातत्याने पाच दिवस प्रवास करून त्याने मुंबई गाठली. तेथे गेट वे ऑफ इंडियाजवळ आयोजित श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात त्याने श्रद्धांजली अर्पण केली. प्रवासादरम्यान असलेल्या शहर व गावांतील पोलिस ठाण्यात अमोलने संपर्क साधून प्रत्येकाला आपला संकल्प सांगितला. पोलिसांनीही त्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

‘लोकमंगल’ची सायकल
अमोलच्या प्रवासाची कल्पना लोकमंगल फाउंडेशनचे रामराजे पाटील यांना आवडली. त्यांनी अमोलला एका नवी सायकल उपलब्ध करून दिली. तसेच शहरातील सोमनाथ चपने यांनी जॅकेट, पंक्चरचे साहित्य, बूट व प्रवासाचे अन्य साहित्य दिले. तसेच मुनीर काझी यांनी त्याला सहकार्य केले.
बातम्या आणखी आहेत...