सोलापूर- राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारूण सय्यद व एमअायएमचे नगरसेवक तौफीक शेख यांच्या गटात मागील रविवारी निवडणुकीवरून हाणामारी झाली होती. यानंतर सय्यद व सगरी यांच्या घरावर दगडफेक झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात नगरसेवक शेख यांना रविवारी सायंकाळी केगावजवळ अटक करण्यात अाली.
या प्रकरणात मागील सोमवारी एमअायएमचे १६ तर राष्ट्रवादीचे नऊ असे २५ जणांना पोलिस कोठडी मिळाली होती. त्यांना गुरूवारी जामीनही मिळाला होता. नगरसेवक शेख व त्यांचा मुलगा अजान या दोघांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता त्यावर सोमवारी सुनावणी अाहे.