परभणी/जालना - एमआयएमने महाराष्ट्रात जातीयवादाचे विष पेरू नये, अत्याचाराची भाषा केल्यास आम्हीही बाळासाहेबांच्या रक्ताचे आहोत हे दाखवून द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत, असा सज्जड इशारा देत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एमआयएमवर कडाडून टीका केली.शिवसेना महाराष्ट्र घडवायला निघाली आहे, त्यामुळे सर्वांनी एकवटून शिवसेनेच्या पाठीशी ताकद उभी करावी, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी शनिवारी परभणीत केले.
१५० जागांवर यश मिळेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी जालन्यात व्यक्त केला. भाजपने तर पाठीत खंजीर खुपसला, असेही ते म्हणाले. गद्दारी करणा-यांना शिवसेनेने गाडून टाकल्याचा इतिहास परभणी जिल्ह्यात आहे, असेही ते म्हणाले.