आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेनंतर जमावाचा उद्रेक, अनेक भागात वाहनांची तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जालना शहरात बुधवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने शहरात दगडफेक केली. त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती होती.

बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने वाहनांवर दगडफेक केली. यात काहींनी घोळक्याने येऊन औरंगाबाद चौफुली ते भोकरदन नाका परिसरात वाहनांची तोडफोड करून काचा फोडण्यात आल्या. विशाल कॉर्नर येथे ट्रॅव्हल्स बस फोडण्यात आली तर शनिमंदिराजवळ काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली. हे लोण शहरातील इतर भागात पसरू नये यासाठी पोलिसांनी शहरात तत्काळ नाकाबंदी करून परिस्थिती वर नियंत्रण मिळवले. दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीने शहरात तणावपूर्ण शांतता होती.
बातम्या आणखी आहेत...