आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना मंत्री लोणीकरांचा आधार, सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील सर्व मुलींच्या विवाहाची जबाबदारी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्वीकारली आहे. यात १ हजार १३० शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या विवाहासाठी मदत दिली जाईल. या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी दिले जाणार आहे.
मराठवाड्यातील १,१३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांशी संपर्क साधला जाणार आहे. याचसोबत शेतमजूर, रोजंदारीवर काम करणारे गोरगरीब शेतकरी कुटुंबांतील मुलींचे विवाह याच विवाह सोहळ्यात लावण्यात येणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री व साधू-संत, महात्मे यांना विवाह सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे. केशव शिक्षण प्रसारक मंडळ, परतूर या संस्थेच्या वतीने २४ एप्रिल २०१५ रोजी दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी परतूर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर हा कार्यक्रम होईल.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न लावणार
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च केला जाईल. यात मंगळसूत्र, आहेराचे कपडे, संपूर्ण प्रवास खर्च, संसारोपयोगी साहित्य व भोजनखर्च करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यास एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहणार असून त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...