आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रेल्वे'च्या मागण्यांसाठी पंतप्रधानांना साकडे घालण्याची मंत्री लोणीकरांची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली असली तरी विविध प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रेल्वे संघर्ष समितीबरोबर सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन रेल्वेच्या समस्येसाठी संघर्ष करू. यासाठी थेट पंतप्रधानांना साकडे घालू, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृहात सोमवारी मराठवाडा रेल्वे परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश टोेपे होते तर प्रमुख पाहुणे माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती. रेल्वे संघर्ष समितीने साेलापूर, जळगाव आणि जालना खामगाव या रेल्वेमार्गाच्या मागणीला मोठा जोर लावला आहे. खरे तर हे मार्ग एकमेकांना जुळल्यास व्यापार, शेती आणि रोजगाराचा मोठा प्रश्न निकाली लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन रेल्वे प्रश्नांवर लढा देण्याची गरज आहे. शिवाय मराठवाडा विभाग हा मुंबई विभागाला जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करून प्रवाशांना रेल्वेमार्गाची सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन लोणीकर यांनी दिले.
जनशताब्दी रेल्वेची ३ जुलै रोजी घोषणा
जनशताब्दी एक्स्प्रेस कधी सुरू होईल याची प्रतीक्षा जालनेकरांना आहे. ही प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार असून ३ जुलै रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू औरंगाबाद येथे येणार आहे. या वेळी जनशताब्दी जालन्यातून सोडण्यासंदर्भात घोषणा केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...