आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांची काही चूकी नाही, साहेबच तर विदेशात सेल्‍फी घेतात, वाचा विविध पोस्‍ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर/औरंगाबाद - दुष्काळग्रस्‍त मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका सेल्फीने सोशल मीडिया युजर्स त्यांच्यावर संतप्त झाले आहेत. पंकजाताई असे 'सेल्फी'श होणे बरे नाही... असे म्हणत यूजर्सने त्यांच्यावर निशाणा साधला होता. पंकजा यांच्‍या या फोटोवर दिवसभरात अनेक प्रतिक्रीया ट्विटर, फेसबूकच्‍या माध्‍यमातून आल्‍या आहेत. सोमवारी दुपारी मुंडेंनी याबाबत स्पष्टीकरणही दिले होते.
हौस म्हणून फोटो नाही काढला....
हौस म्हणून आपण फोटो काढला नसल्‍याचे पंकजा यांनी सांगितले आहे. त्‍या म्हणाल्या, 'दुष्काळाने होरपळत असलेल्या रखरखीत भागात पाणी दिसल्याने फोटो काढला.' माझ्या खात्याने केलेल्या कामाला यश आल्यामुळे मी हा फोटो काढला आहे. हा फोटो माझ्या खात्‍याच्‍या कामाचा होता असेही त्‍यांनी सांगितले.' पण, सोशल मिडियासह विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्‍यावर निशाणा साधला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, काय आहेत सोशल मीडियावरील प्रतिक्रीया....