आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minor Girls Rape Case Latest News In Beed, Maharashtra

सरपण आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन नराधमांनी दोनदा केला बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - सरपण आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोनदा बलात्कार केल्याची घटना गेवराई शहरात घडली. यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गेवराईच्या संजयनगर भागात राहणारी आणि इयत्ता सातवीत शिकणारी मुलगी सरपण आणण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या मागील भागात गेली होती. या वेळी तिची मोठी बहीणदेखील तिच्यासोबत होती. गुरुवारी दुपारी ती सरपण डोक्यावर घेऊन घराकडे निघाली. याच वेळी महेश ऊर्फ गुड्डू रखमाजी ढवळे (35, रा. शिवाजीनगर) आणि ऋषिकेश युवराज पंडित (27, रा. दैठणा) हे दोघे रिक्षाने मुलीला रस्त्यात आडवे आले. सरपण घेऊन जाण्यासाठी तुझ्या आईने रिक्षा पाठवला आहे, असे सांगून मुलीला रिक्षात बसवले. सरपणाचा भारा घरी टाकून मुलीला तुझ्या बहिणीकडे सोडतो म्हणत मुलीला कोल्हेर गावाजवळ कालव्याच्या बाजूला नेले. तेथे मुलीला धमकावून महेश ऊर्फ गुड्डू ढवळे याने बलात्कार केला. तेथून मुलीला धमकावत या नराधमाने रिक्षा माजलगाव रस्त्याने वळवून पुन्हा बलात्कार केला. रात्री बारा वाजता पीडित मुलीला आरोपींनी माजलगाव बसस्थानकासोर सोडले. भयभीत झालेली पीडित मुलगी शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत माजलगाव बसस्थानकात बसून होती.