आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MKP Vrinda Karat Comment On PM Modi At Beed Maharashtra

माेदींनी मराठवाड्याचा दुष्काळ येऊन पाहावा; वृंदा करात यांचे अावाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- डिजिटल इंडिया, मेक इन इंडियाची माेठमाेठी स्वप्ने दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी परदेश दाैऱ्यातच मग्न अाहेत. मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली अाहे. येथील मजूर, पशुधन, पाणी, छावण्यांवर संकट अाेढवले अाहे. अशा गंभीर समस्यांवर तत्काळ सुविधा पुरवण्यासाठी पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरने नव्हे तर प्रत्यक्षात पाहणी दाैरा करावा, असे अावाहन माकप पॉलिटब्युरो सदस्य वृंदा करात यांनी केले.

दुष्काळी िस्थतीत मजुरांना मिळणारी मजुरी व कामाचे निकष, प्रशासन व सरकारमधील संपलेल्या संवेदनशीलतेच्या िवराेधात तीन मे राेजी अाैरंगाबाद येथील विभागीय अायुक्त कार्यालयावर माेर्चा काढण्यात येणार असून त्या संदर्भाची माहिती देण्यासाठी व बीडच्या दुष्काळी दाैऱ्याच्या पाहणीनंतर वृंदा करात यांनी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी माकप राज्य सचिव मंडळ सदस्य पी.एस. घाडगे, डाॅ. भाऊसाहेब झिरपे, प्रा. एम.एस. वाघमारे उपस्थित हाेते.

वृंदा करात म्हणाल्या, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दुष्काळी हक्क, शेतकऱ्यांना कर्जमाफी, पशुधन रक्षण, मजुरी व कामातील संबंधित जिल्ह्यांच्या परिस्थितीनुसार निकषात बदल करणे याबाबत तीन मे राेजी अाैरंगाबाद येथील िवभागीय अायुक्तांच्या कार्यालयावर सरकार व प्रशासनाच्या िवराेधात माेर्चा काढण्यात येणार अाहे. त्या म्हणाल्या, मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. हे एका वर्षासाठी नव्हे तर वर्षानुवर्षे सुरू आहे. पण केंद्र व राज्य सरकारकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाही हे दुर्दैव अाहे, असेही यावेळी वृंदा करात म्हणाल्या.

संवेदनशीलता संपली
मजुरांच्या बाबतीत होत असलेले धोरण चुकीचे आहे. मजुरी कमी व त्यांची दैना निर्माण केली जात आहे. मजुरांमध्ये शेतकरी व भूमिहीन लोकांचा समावेश आहे. मराठवाड्यात प्रशासकीय यंत्रणा व सरकारमधील संवेदनशीलताच संपल्याचे चित्र दिसत असल्याने हे सरकार मजुरांच्या बाबतीत क्रूर बनले अाहे, असा अाराेपही वृंदा करात यांनी केला.