आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारपुत्राचा सामूहिक सोहळ्यात विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - दुष्काळात शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला असून मुलांबाळांच्या विवाहाचे गणित चुकत असल्याचे पाहून सत्ताधारी भाजप- शिवसेना- काँग्रेसच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सिल्लोड येथे केले होते. विशेष म्हणजे केवळ गोरगरिबांचेच यात विवाह केले जातात परंतु या सोहळ्यात आयोजक आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुत्राचा विवाहदेखील यात करत समाजासमोर पुढाऱ्यांसमोर सत्तारांनी एक अादर्श घालून दिला. या वेळी मौलाना गुलाम वस्तानवी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरसह युवक काँग्रेसचे विश्वजित कदम आदींची उपस्थिती होती. आ.अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून ५५५ जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.

स्वत:च्या मुलाचा विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात करून सत्तार यांनी कृतीतून आदर्श ठेवल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. या वेळी अशोक चव्हाण पुढे म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष, संघटनांकडून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु सातत्याने तेरा वर्षांपासून आ.सत्तार अशा प्रकारे विवाह सोहळ्याचे आयोजन करीत असून ही एक कौतुकाची बाब आहे. समाजासमोर त्यांनी कृतीतून आदर्श ठेवताना त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा विवाह याच सोहळ्यात केला.
बातम्या आणखी आहेत...