आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चक्रव्यूहात अडकले ‘अर्जुन’; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आशा, आता चौरंगीऐवजी तिरंगी लढत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- विधानसभेसाठी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने उच्च न्यायालयाने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून त्यातून आपल्याला दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. मात्र तसे झाले नाही तर पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे हा त्यांच्यासमोर पर्याय अाहे. परंतु गेल्या तीन वर्षात जालना विधानसभा मतदारसंघातील गणिते मोठ्या प्रमाणात बदलली असल्याने येथे अाता भाजप, शिवसेना अाणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर हाेण्याची चिन्हे अाहेत.


जालना विधानसभा मतदारसंघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे चार वेळा विजयी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. त्यामुळेच १५ महिन्यांपूर्वी ८ जुलै २०१६ रोजी शिवसेनेने त्यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी संधी दिली. मात्र विधानसभा निवडणुकीत विहित वेळेनंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उच्च न्यायालयाने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर त्यांना पुढील चार आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुदत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निकालाची वैधता तपासली जाईल अशी त्यांना अाशा आहे. मात्र जर तसे झाले नाही तर या मतदारसंघासाठी पुन्हा निवडणूक होऊ शकते. तीन वर्षांपूर्वी या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. त्यात शिवसेना, काँग्रेस,भाजप व बसपा या प्रमुख पक्षात ही लढत होती. मात्र तीन वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत आता मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. गेल्या तीन वर्षात भाजपने येथे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघात प्रथमच भाजपने उमेदवार दिला होता. त्यात अरविंद चव्हाण हे ३७ हजार ५९१ मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर होते. 

 

सेनेला मंत्रिपद जमेची बाजू 
१९९५ ला युतीचे सरकार सत्तेवर असताना शेवटच्या काळात अर्जुन खोतकर यांना राज्यमंत्रिपद मिळाले तर आता १५ महिन्यांपूर्वी त्यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात संधी मिळाली. अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप,रेशीम कोशासाठी जालन्यात राज्यातील पहिली बाजारपेठ आणली व शिवाय अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना या बाबी जमेच्या आहेत. 

 

भाजपला उमेदवाराचा शोध 
भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जालना विधानसभा मतदारसंघात लक्ष देऊन येथे स्वत:ची ताकद निर्माण केली आहे. मात्र या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असेल ते महत्त्वाचे ठरणार आहे. माजी उपनगराध्यक्ष तथा दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे भाजपचे उमेदवार असतील, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. मात्र त्यास स्वत: प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी हिरवा कंदील दिलेला नाही. तर माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमात उघडपणे उमेदवारी मागितलेली आहे. 

 

गोरंट्याल यांना संजीवनी 
विधानसभा निवडणुकीत २९६ मतांनी पराभूत झालेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना वर्षभरापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर नवसंजीवनी मिळाली आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात आला असताना त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांनी राज्यातील सर्वाधिक मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाचे आव्हान समोर असताना त्यांनी हा विजय मिळवल्याने काँग्रेस व पर्यायाने गोरंट्याल यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरली आहे. 

 

हेही वाचा... 

> न्यायालयात उघडी पडली राजकारणी, अधिकाऱ्यांची मिजास; निकालातील महत्त्वपूर्ण बाबी

राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची आमदारकी हायकोर्टाकडून रद्द; मुदत संपल्यावर उमेदवारी अर्ज केला दाखल

बातम्या आणखी आहेत...