आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार हर्षवर्धन जाधवांकडून कन्नडला काँग्रेसचे ‘सर्जिकल स्ट्राइक’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- कन्नड बाजार समितीत उमेदवारी देताना विश्वासात घेतले नाही म्हणून काँग्रेस पक्षातील नाराज नेते कार्यकर्त्यांनी बाजार समितीसह भविष्यातील सर्व निवडणुकांत आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या स्व.रायभान जाधव विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे. आ.जाधवांच्या या राजकीय खेळीमुळे कन्नड काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राइक होऊन स्व.रायभान जाधव विकास अाघाडीस बळकटी मिळाली आहे.

शहराला लागून चिकलठाण फाट्यानजीक काँग्रेसचे गटनेते अब्दुल जावेद यांच्या शेतात बुधवारी काँग्रेसमधील नाराज गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी तालुक्यातील काँग्रेस पक्षातील दीर्घकालीन नेते, कार्यकर्ते, सरपंच, विकास संस्थांचे अध्यक्ष, बाजार समितीचे मतदार उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते भाऊसाहेब थोरात म्हणाले की, तीन ते चार तास चाललेल्या बैठकीत आम्ही आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या स्व.रायभान जाधव विकास आघाडीला विनाअट पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी वाटपासाठी जी समिती नेमली त्या समितीने स्वतःच उमेदवारी घेतली, कार्यकर्ते इच्छुकांना साधा फोनही केला नाही.
१५ ते २० वर्षांपासून तेच तेच चेहरे समोर येत आहेत. स्वतःला स्वयंभू समजणारे हे नेते स्वतःचा पक्ष समजून स्वतःच निर्णय घेतात. मॅनेजरही तेच शिपाई पण तेच आहेत.आमची मते वाया जाणार नाहीत याची खात्री करून विकास आघाडीला आम्ही पाठिंबा दिला आहे. या वेळी आमदार जाधव म्हणाले, काँग्रेसमधील नाराजांचे विकास आघाडीत स्वागत असून या नवीन संचाला बरोबरीचा दर्जा देऊन आगामी सर्व निवडणुकांत उमेदवारी दिली जाईल. मतदारसंघात अनेक कार्यकर्ते समाजकारण राजकारणातून स्वतःच्या बळावर पदाधिकारी झाले आहेत. त्यांचे हे सर्व कष्ट आपण विविध पक्षांना अर्पण करतो. हल्ली सर्वच पक्ष ठेकेदारांच्या दावणीला बांधलेले असून मी स्वतः शिवसेनेचा आमदार असून मला बाजार समितीत पॅनल तयार करता आले नाही.

कुण्या पक्षाच्या पाठीशी घालण्यापेक्षा ही शक्ती एकत्र आणून आपलीच उमेदवारी आपणच वाटायची, मुंबई-दिल्लीच्या मागे पळण्यापेक्षा या पद्धतीने काम झाल्यास प्रत्येकाला कष्टाचे फळ मिळेल. वसंतराव देशमुख, अर्जुन कोरडे, पंढरीनाथ खैरनार आदी उपस्थित होते.

कन्नड बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातील नाराज नेते, कार्यकर्ते मतदारांनी आमदार जाधव यांच्या विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला. या वेळी उपस्थित आमदार हर्षवर्धन जाधव, भाऊसाहेब थोरात इतर.
बातम्या आणखी आहेत...